आलासमधील तरूणाला बेदम मारहाण वाहनांचीही तोडफोड

कोल्हापूर – शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे फाटा येथील शनिवारी रात्री साडेआठच्या सुमाराला पट्टणकोडोलीतील आरिफ हुमायून हेरवाडे,  अनिस हुमायून हेरवाडे, हातकणंगलेतील नूरमहंमद इब्राहिम शेख, सरफराज इकबाल कोल्हापुरे, रेहान कोल्हापुरे, जहीर कोल्हापुरे, फिरोज आणि अन्य १० ते १२ जणांनी मिळून आलासमधील समीर मुजावर यांना गाठून बेदम मारहाण केली. तसेच चारचाकीची तोडफोड करून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान केले आहे. एका महिलेला पळवून नेल्याच्या संशयावरून त्यांनी समीर यांना मारहाण केल्याचे समजतंय. या प्रकरणी समीर मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिसांनी पंधरा ते  वीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Scroll to Top