नव्या पिढीला सोशल मिडीयाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा : आ. सतेज पाटील

कोल्हापूर – सध्याची पिढी ही सोशल मीडियाचा वारेमाप वापर करतीय, या चक्रव्यूहातून नव्या पिढीला बाहेर काढण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. शाहू स्मारक भवन येथिल  करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.  

यावेळी आमदार जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थित होती. सुरूवातीला प्रास्ताविकात शिक्षक नेते कृष्णात कारंडे मागील पंचवीस वर्षांपासून संस्थेला आमदार सतेज पाटील यांची भक्कम साथ लाभल्याचे सांगून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था ही करवीर तालुक्याची अस्मिता असल्याचे सांगिले. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात सहकाराचा मोठा वाटा आहे. सहकारामुळेच सर्वसामान्यांना मोठा आधार मिळाला असून सहकार टिकण्यासाठी सहकारी संस्था टिकवल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले.  

यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त सभासद, नूतन केंद्रप्रमुख, नवनियुक्त शिक्षक, पदन्नोती झालेले शिक्षक आदींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी करवीर पंचायत समिती सभापती साताप्पा पाटील, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, भोगावती शिक्षण मंडळाचे चेअरमन दिगंबर मेडशिंगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमर पाटील, युवराज गवळी, करवीर पंचायत समितीचे सदस्य निवास पाटील, विलास भोसले, तानाजी किल्लेदार, सदस्या मेघा नाळे, उदय सरनाईक, सुरेश कोळी, पद्मजा मेढे, दीपाली, भोईटे, वर्षा केनवडे, पतसंस्थेचे चेअरमन धनाजी सासणे, व्हाईस चेअरमन सचिन पावसकर, सचिव संदीप शिंदे यांच्यासह सर्व संचालक मंडळ, सभासद उपस्थित होते.

Scroll to Top