इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात गोंधळ…

इचलकरंजी – शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या शिरदवाडच्या वंदना कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून पुढील वैद्यकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, मृत महिलेच्या नातेवाईकांनी उत्तरीय तपासणी करण्यास तीव्र विरोध केला. सोमवारी सायंकाळी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेत असताना मृत महिलेच्या सासू चंदा कांबळे यांनी आक्रोश केल्याने रुग्णालय परिसरात काही काळ गोधळांचे वातावरण निर्माण झाले होते. सुनेच्या छातीत दुखत असल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखले केले होते. मात्र उपचार करण्याआधीच सुनेचा मृत्यू झाल्याचे चंदा कांबळे यांनी सांगितले.

नातेवाईकांचा वाढत चाललेला आक्रोश पाहून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये. यासाठी रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती देत मदतीसाठी पाचारण केले. पोलीस घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. दरम्यान याबाबत रुग्णालायातील डॉक्टरांशी याबाबत संपर्क साधला असता वंदना कांबळे यांना हृदय विकाराचा पहिला झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु असताना उपचारादरम्यान दुसरा हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

Scroll to Top