ब्रेकिंग न्यूज
आरोग्य

धक्कादायक : ‘या’ जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयाला आग…

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

अमरावती – आज (सोमवार) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाला अचानक आग लागली. या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. झालेल्या दुर्घटनेमुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

नवजात शिशू कक्षात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन ही आग लागली. या कक्षात 9 बालके होती. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी शिशू कक्षात असलेल्या बालकांना बाहेर काढले. मात्र, तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top