मुंबई – राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने आज मुंबईमध्ये धडक कारवाई केली आहे या कारवाईत दक्षिण मुंबईतील नऊ रेस्तराँचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
ज्यामध्ये नॅचरल्स आईस्क्रीम, बेरुट, मियाँ कबाबसह ८० वर्षे जुन्या चेतना रेस्तराँचा समावेश आहे. या कारवाईत चेतना, कॅफे आयडियल, मियाँ कबाब्स, बेयरूट आणि नॅचरल्स आईस्क्रीम या प्रसिद्ध रेस्तराँ आणि आऊटलेट्सचा समावेश आहे. स्वयंपाक घरांमध्ये अस्वच्छता, किटकांचा प्रादुर्भाव, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आणि अनिवार्य सुरक्षा नोंदींचा अभाव आदी गोष्टी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.




