कोल्हापूर – नगर रचना विभागाशी संबंधित यु.डी.सी.पी.आर. नियमावली अंतर्गत महसूलसह विविध विभागांमध्ये बांधकाम परवानगी आणि ले आऊट मंजुरी तसेच विविध अडचणी संदर्भात पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी असोसिएशनच्या सभासदांनी विविध समस्या मांडल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मीन, जिल्हा आणि तालुका स्तरावरील संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री आणि प्रशासनाच्यावतीने सकारात्मक निर्णय घेण्यात आला. दरम्यान महसूल विभागातील अडचणींचे निराकरण करण्याबाबत पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे आणि माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी अनेक मुद्दे मांडलेत. बांधकाम परवानगीसाठी सध्या ऑनलाईन प्रणालीचा अंमल सुरु आहे. या प्रणालीमधील अडचणी मांडण्यात आल्या. शेती क्षेत्रातील डी. पी. रोड, प्रलंबित असलेला कोल्हापूर शहर विकास आराखडा, पूर बाधित क्षेत्र व त्या संबंधाने येणाऱ्या पूर रेषे संबंधीच्या नव्याने आखणी, विमानतळ प्राधिकरण कडील ना हरकत दाखले यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.
या बैठकीवेळी असोसिएशचे उपाध्यक्ष विजय चोपदार, सेक्रेटरी राज डोंगळे, प्रशांत काटे, उमेश कुंभार, प्रमोद पोवार, माणिक पाटील, निशिकांत गोरूले प्रविणचंद्र वायचळ, राधेशाम रेंगडे, अशोक रेंगडे , पराग माने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.




