व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचे निधन…

101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे – व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचे आज पुण्यातील वृद्धाश्रमात निधन झाले आहे. यावेळी त्यांचे वय 101 वर्ष होते. त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा.रुकसाना अशा दोन मुली आहेत.
प्रा. यास्मिन शेख या मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका आणि शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 21 जून 1925 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव जेरुशा रुबेन होते. मराठी लेखन मार्गदर्शिका, मराठी शब्दलेखन कोश, सुगम मराठी व्याकरण कोश अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

Scroll to Top