महापालिकेसमोर केलं आंदोलन
कोल्हापूर – महानगरपालिकेकडून पाणीपट्टीत वाढ करण्याबाबत आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी मंगळवारी सूचक वक्तव्य केले होते. याबाबत आजच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाणार होता. त्यामुळे सभा सुरु होताच शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने महानगरपालिका परिसरात आंदोलन करत या निर्णयाला विरोध दर्शवण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी जलअभियंता हर्षजीत घाटगे यांना घेराव घातला. आधी शुद्ध पाणी द्या, गळती काढा, मग दरवाढ करा, असे म्हणत घाटगे यांना चांगलंच धारेवर धरले. दरवाढ केल्यास रस्त्यावरचा लढा उभारण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार यांनी दिला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विराज पाटील, शहराध्यक्ष मनजीत माने, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत- मांढरे, अवधूत साळोखे, राजू यादव, दिनेश साळोखे, गोविंद वाघमारे, रीमा देशपांडे, अनिता ठोंबरे, दिपाली शिंदे, राजू जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.



