मुंबई – नरेंद्र मोदी हे फक्त 7 ते 8 महिने पंतप्रधानपदी राहतील ते आपला संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत, असे वक्तव्य खा. संजय राऊत यांनी केले आहे.
खा.संजय राऊत यांनी, 17 सप्टेंबर या तारखेचाही विशेष उल्लेख केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी असतो. यंदाचा वाढदिवस मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस ठरू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या दिवशी किंवा त्यानंतरच्या काळात काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी समोर येतील, असे संकेतही राऊत यांनी दिले आहेत.




