पंचगंगा नदी परिसरात गणेश विसर्जनावरून वादावादी...हिंदुत्ववादी संघटना आक्रमक 

<p>पंचगंगा नदी परिसरात गणेश विसर्जनावरून वादावादी...हिंदुत्ववादी संघटना आक्रमक </p>

कोल्हापूर – आज सातव्या दिवशी गणपती विसर्जन करण्यासाठी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते पंचगंगा नदीवर आले असताना नदी परिसरात महापालिकेने बॅरिकेट लावून नदीकडे जाणारा  मार्ग बंद केला आहे त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे. आमचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी महापालिकेवर केला आहे. 
यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी, आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत असल्याचे म्हटले आहे. यावेळी नदी परिसरात  हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते हे मनपा अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत आहेत त्यामुळे संघटना आणि महापालिका अधिकारी यांच्यात वाद पेटला आहे.