तृतीयपंथीयांच्या सन्मानात राजेश्वरीचा पाचवा वाढदिवस ; प्रत्येकासाठी ५ लाखांच्या अपघात विम्याचा संकल्प
कोल्हापूर - सामाजिक उत्तरदायित्व जपत कु. राजेश्वरी राहुल जगताप हिचा पाचवा वाढदिवस तृतीयपंथीयांच्या सन्मानपूर्वक उपस्थितीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या उपक्रमाने समाजात समता, सन्मान आणि सामाजिक सुरक्षिततेचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमात राजेश्वरीचे आई-वडील राहुल जगताप व राधिका जगताप यांनी उपस्थित तृतीयपंथीयांचे साडी, ओटी व आहेर देऊन पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. याप्रसंगी राजेश्वरीचे आजोबा एस. बी. जगताप व एस. जी. पाटील यांनी, कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संबंधित तृतीयपंथी तसेच कोल्हापूरमध्ये कार्यरत तृतीयपंथीयांपैकी प्रत्येकासाठी भारतीय डाक विभागाच्या अपघात विमा योजनेअंतर्गत प्रत्येकी ५ लाखांचा अपघात विमा काढून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. या योजनेसाठी लागणारा संपूर्ण खर्च कुटुंबाकडून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमास स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभाग प्रमुख डाॅ.श्रीराम साळुंखे,आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रमोद संकपाळ,अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय कार्यवाह प्रा.अशोक पाटील,न्यू काॅलेजचे प्राचार्य डाॅ.व्ही.एम.पाटील,प्रिन्स शिवाजी बोर्डींगचे उदय पाटील,डाॅ.डी.वाय.पाटील हाॅस्पीटलचे समन्वयक अजित पाटील,अमर पाटील,प्रदीप पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.