रिक्षा चालक साद पठाण खून प्रकरणातील मुख्य संशयिताला  विक्रमनगरात फिरवलं...

<p>रिक्षा चालक साद पठाण खून प्रकरणातील मुख्य संशयिताला  विक्रमनगरात फिरवलं...</p>

कोल्हापूर - आठ जूनला पूर्ववैमनस्यातून विक्रमनगरमधील रिक्षाचालक साद पठाण याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित सचिन आगलावे याला तपासासाठी विक्रमनगर परिसरातून फिरवण्यात आले.  

या प्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी सुरुवातीला दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणातील रोहन राऊत या आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य संशयित सचिन आगलावे हा गुन्हा घडल्यापासून पसार होता. अखेर पंधरा जूनला राजारामपूरी पोलीसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. सोमवारी सायंकाळी त्याला पोलिसांनी विक्रमनगर परिसरात तपासासाठी फिरवले. संशयित सचिन आगलावे याला विक्रमनगरमध्ये तपासासाठी आणल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.