खळबळजनक : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात एका मदरशात अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचारासारखी खळबळजनक घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठा गोंधळ उडाला आहे.
नागपुरातील ताजबाग परिसरातील तावीज नगर येथील एका मदरशात अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार झाला आहे. सध्या पोलिसांनी 10 अल्पवयीन मुलांना रेस्क्यू केले आहे. त्यापैकी दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता राज्य अल्पसंख्याक आयोगाने वर्तवली आहे.