पावसाअभावी शेतकरी टाहो फोडत असल्याचे अमित शहांना दिसलं नाही का? : विनायक राऊतांचा सवाल
कोल्हापूर - पावसाअभावी शेतकरी टाहो फोडत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिसलं नाही का ? असा सवाल माजी खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मराठी अस्मिता पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते अमोल बुड्ढे, पद्माकर कापसे, गजानन तोडकर, दिलीप देसाई, दीपक गौड, शितल धनवडे, राजू सांगावकर, सुचित हिरेमठ, संभाजी भोकरे, राजू यादव, संभाजी पाटील, रघुनाथ टिपुगडे, बाबूराव पाटील, तानाजी आंग्रे, कमल पाटील, हाजी अस्लम सय्यद, सुषमा कवाळे, विष्णू रेडेकर, बाळासाहेब नलवडे, अनिल दबडे, संजय लाड, अजित बोडेकर, शुभांगी साळोखे आदिंना हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना राऊत यांनी, पक्षांतर करणाऱ्या गद्दारांना मतदारच योग्य वेळी धडा शिकवतील, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी, गुवाहाटीला जाण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मला फोन केल्याचे सांगितले. मात्र मी शिवसेना सोडणार नसल्याचे त्यांना सांगितले. माझ्या मुलीला भाजपकडून तिकीट मिळत होत. मात्र, मी नकार दिला. माझ्याकडून गद्दारी होणार नाही असे सांगून झारीतील शुक्राचार्यांची आता दखल घ्यायला हवी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी, कार्यकर्त्यांनी पक्ष बळकटीसाठी एसआयआरकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. यावेळी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख विशाल देवकुळे, वाहतूक सेना राज्य अध्यक्ष उदय दळवी, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक सुनील मोदी, शहरप्रमुख मंजित माने यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.