जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या मुख्य संशयिताला तीन दिवसांची पोलिस कोठडी...
इचलकरंजी - शहरात हात उसने म्हणून घेतलेल्या सात हजार रूपयांची व्याजासह परतफेड करण्याचा तगदा लावत जबरदस्तीने वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील पसार झालेला मुख्य संशयित सर्जेराव कुंभार याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील उज्ज्वला दोरूगडे, विनायक पवार आणि युनूस गवंडी हे तिघे न्यायालयीन कोठडीत आहे.