नवी दिल्ली – शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. यावेळी त्यांनी, “केवळ आमदारांच्या संख्येवर राजकीय पक्षाची मालकी ठरवता येत नाही. पक्षाची संघटनात्मक रचना आणि पक्षाची घटना सर्वात महत्त्वाची असते,” असा दावा केला.
निवडणूक आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता, तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी आधी पक्षाची घटना पूर्णपणे दुर्लक्षित केली. त्यानंतर पक्षाची संघटनात्मक रचना बाजूला ठेवली. शेवटी आयोगासमोर फक्त ‘विधिमंडळ पक्ष’ (आमदार आणि खासदार) उरला. याच्याच आधारे दुसऱ्या गटाकडे विधिमंडळात बहुमत आहे, असा दावा करत त्यांना पक्षाचे चिन्ह बहाल करण्यात आले, असा युक्तिवाद सिब्बल यांनी न्यायालयात केला

