शाळकरी मुलीचा विनभंग केल्या प्रकरणी तीन वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा

पन्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा राहुल अशोक भोसले हा त्याच्या चार चाकी वाहनातून विद्यार्थी वाहतूक करत होता. सप्टेंबर २०२४ मध्ये विद्यार्थी वाहतूक करताना राहुल भोसले यानं प्रवासा दरम्यान एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून राहुल भोसले यांच्या विरोधात पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पन्हाळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडूभैरी यांनी याप्रकरणी तपास करून आरोपी राहुल भोसले याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. आज या खटल्यात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर.व्ही. अदोने यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी राहुल अशोक भोसले याला तीन वर्षे सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलीय. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड.एम.बी. पाटील यांनी काम पाहिलं.

Scroll to Top