ब्रेकिंग न्यूज
आंदोलन

इंडिया आघाडीच्या नियोजित मोर्चामुळे दिल्लीतील वातावरण तापलं…विरोधकांना भेटण्यास सरन्यायाधीशांची असमर्थता

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

नवी दिल्ली – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्यावतीने आज दुपारी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीशांना निवेदन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या मोर्चाला सर्वोच्च न्यायालायात भेटण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी असमर्थता दर्शवली आहे.

यावर माध्यमांसमोर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, त्यांचं पत्र मला काल मिळालं आहे. तसेच त्याला मी उत्तरही दिलं आहे. तसेच शिष्टमंडळ घेऊन भेटायला येणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटण्याबाबत मी असमर्थता व्यक्त केली आहे.तसेच त्यामागची काही कारणंही मी सांगितली आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. कुणीही नागरिक असो वा कुठल्या लोकनियुक्त संस्थेतील सदस्य असो, तो याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकतो. आमच्याकडे येण्याचा भारतातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. आम्ही कायदेशीर व्यवस्था आणि कायद्यानुसार त्याची जी समस्या असेल त्यावर आम्ही सुनानणी घेऊ. तसेच त्यांना त्यांचा योग्य तो अधिकार देऊ.
यावेळी दिल्लीत सातत्याने होत असलेल्या आंदोलनांबाबत विचारले असता कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे. तो माझा विषय नाही, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top