ब्रेकिंग न्यूज
आंदोलन

श्री अंबाबाई मंदिरात वादावादी… पुजाऱ्यांचे आंदोलन…

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरामध्ये पुजाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. नवरात्रोत्सवात सुरु झालेल्या या आंदोलनामुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.
आज सकाळी अभिषेकला जाणाऱ्या मूर्तीला गरुड मंडपात जाण्यास अडवले गेले यावेळी पुजारी आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली या वादावादीमध्येच मूर्ती घेऊन जावी लागली. तसेच काल शेजारतीला आरतीसाठी वाट करून दिली गेली नाही या गोष्टी धार्मिक कार्यासाठी चुकीच्या असल्याची पुजाऱ्यांची भूमिका आहे. तसेच भक्तांना मंदिरात प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा सोडली नाही. तसेच मूर्तीचे स्नान आणि लागणारे सामान घेऊन येताना अडथळा करण्यात आला. यामुळे श्रीपूजकांनी आक्रमक होत आंदोलन सुरु केले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top