ब्रेकिंग न्यूज
धार्मिक

विद्युत रोषणाईने उजळले अंबाबाई मंदिर!नवरात्रोत्सवापूर्वी मंदिराला नवे रूप; ऐतिहासिक कोरीव कामाचा सौंदर्यपूर्ण आविष्कार

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात श्री अंबाबाईच्या मंदिराचे सौंदर्य अधिक खुललंय. राज्य पुरातत्त्व विभागामार्फत सुरू असलेल्या संवर्धन प्रक्रियेअंतर्गत मंदिर अत्याधुनिक प्रकाश यंत्रणेने उजळवण्यात आलंय. या विद्युत रोषणाईमुळे मंदिरातील ऐतिहासिक स्थापत्यकला आणि दगडांवरील कोरीव काम नव्या झळाळीत उजळून निघाले आहे.
चालुक्य, शिलाहार आणि यादवकालीन स्थापत्यपरंपरेचा वारसा लाभलेल्या श्री अंबाबाई मंदिरातील विविध वास्तुशिल्पे प्रकाशयोजनेमुळे अधिक ठळकपणे दिसत आहेत. मंदिराच्या प्राचीन वास्तूचे सौंदर्य आणि त्यावरील बारकाईने केलेली कलाकुसर या रोषणाईमुळे भाविकांना जवळून अनुभवता येणार आहे. मंदिराच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रक्रियेला या प्रकाशयोजनेमुळे सौंदर्याची नवी किनार लाभलीय. नवरात्रोत्सवात श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक कोल्हापुरात येतात. अशा वेळी मंदिराचे हे नवे रूप भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. ऐतिहासिक वारसा, प्राचीन स्थापत्यकला आणि आधुनिक प्रकाशयोजना यांचा सुंदर संगम साधल्याने अंबाबाई मंदिराचे रूप अधिकच देखणे झाले असून, नवरात्रोत्सवाच्या उत्साहात भर पडली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top