पुणे – एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील एस एम जोशी पूल परिसरात एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला ह विद्यार्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनातील विद्यार्थांना आता पुणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
नोटीसमध्ये विद्यार्थ्यांना एस एम जोशी पूल परिसर रिकामा करण्यास सांगितले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान, विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे पोलिस नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




