कृषी

शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगला म्हसवेच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध… मॅपिंगचे काम बंद पाडले

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – भुदरगड तालुक्यातील म्हसवे गावात आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास प्रशासनामार्फत शक्तीपीठ महामार्गाचे मॅपिंग करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. याची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकरी एकत्र आले आणि त्यांनी या कामाला तीव्र विरोध केला.

“आमच्या जमिनीवर आमचा हक्क”

“आमच्या जमिनीवर आमचा हक्क आहे. आमच्या संमतीशिवाय कोणतीही जमीन मोजणी करू नये,” असा ठाम निर्धार व्यक्त करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी संतप्त शेतकरी आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यामुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

मशीन, वाहनांचे नुकसान

या संघर्षामध्ये मॅपिंगसाठी वापरण्यात आलेल्या मशीन आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच मोनार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावातून बाहेर जाण्यास भाग पाडण्यात आले. अखेर गावकऱ्यांनी तीव्र विरोध करत शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगचे काम पूर्णपणे बंद पाडले आणि प्रशासनाच्या पथकाला गावातून माघारी जाण्यास भाग पाडले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top