आंदोलन

जमीन सर्वेक्षणाच्या विरोधासाठी राजू शेट्टी गनिमी काव्यानं घटनास्थळी दाखल ; ‘कितीही पोलिस बंदोबस्त आणा, आमची जमीन…: शेट्टींचा इशारा

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

सांगली – शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये प्रशासनाकडून जमिनीचं मॅपिंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला शेतकऱ्यांमधून जोरदार विरोध होत आहे. अशाच प्रकारे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत. या ठिकाणी पोहचण्यासाठी राजू शेट्टींना गनिमी कावा करावा लागला आहे.

या ठिकाणी राजू शेट्टी पोहचू नयेत यासाठी पोलीस त्यांचा पाठलाग करत होते त्यांना चकवा देत ते गनिमी काव्याने घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत सोशल मीडियावर बोलताना राजू शेट्टी यांनी, ‘कितीही पोलिस बंदोबस्त आणा, आमची जमीन तुम्ही खांद्यावर घेऊन जाऊ शकत नाही. तुमच्यात दम असेल तर जमिनीचा ताबा घ्यायला या, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
शक्तीपीठ महामार्गातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टोळक्याला ५५ ते ६० हजार कोटी रुपये निवडणूकीसाठी कमावता यावेत, यासाठी शेतकऱ्यांनी जमिनी सांभाळलेल्या नाहीत, त्यामुळे यांची राक्षसी महत्वकांक्षा मोडून काढण्यासाठी आपण शांत बसायचं नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top