हायकोर्टाकडून विद्यार्थांना विनंती
पुणे – गेल्या सात दिवसांपासून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. यावर एका याचिकाकर्त्याने विद्यार्थांच्या आंदोलनाचा पुणेकरांना त्रास होत असल्याचे म्हणत हायकोर्टात धाव घेतली आहे. यावर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. भरतीत घोळ असेल तर आवाज उठवणे हा यांचा हक्क आहे. विद्यार्थी समाजकंटक नाहीत विद्यार्थ्यांना रस्त्यावर येण्याची हौस नाही, असे निरीक्षण नोंदवले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करून निर्णय घ्या, असेही कोर्टाने सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
पुण्याला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुख्य उद्देश हा शिक्षण असतो ना की आंदोलन करण्याचा. तुम्ही विद्यार्थ्याचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य ती संधी मिळाली पाहिजे, असेही कोर्टाने म्हटले आहे. तर दुसरीकडे हायकोर्टाने विद्यार्थ्यांना आंदोलन मागं घ्या आणि आपल्या अभ्यासाला लागा अशी विनंती केली.




