मुंबई – राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने महराष्ट्रातील ७५ टक्के भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर आज राज्य सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
सरकारचे निर्णय
- जमीन महसुलात सूट
- पीक कर्जाचे पुनर्गठन
- शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती
- कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट (7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ, आता त्यावरील वीजपंपांनाही सूट)
- शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी
- रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करणार
- आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स
- टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही
- शेतीवर आश्रित शेतकरी/शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवणार
- जनावरांच्या चार्याची व्यवस्था करणार
- जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणार
- पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरुच ठेवणार
- पंचनाम्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे सर्व जिल्हाधिकार्यांना आदेश
- पिकांची स्थिती दाखवणारे छायाचित्र, जीपीएस संकलित करण्याचे आदेश




