मुंबई – राज्याच्या ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदलीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यात शिक्षकांच्या बदलीनंतर रुजू न होणाऱ्या शिक्षकांवर थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. शिक्षकांना बदलीविरोधात तक्रार करायची असल्यास अगोदर नवीन बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे.
बदली आदेशाला स्थगिती नसतानाही नवीन ठिकाणी रुजू न होणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी संबंधित शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे.




