रविकिरण इंगवलेंसह त्यांच्या साथीदारांना अटक करा : शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण

कोल्हापूर – शहरातील शाहूपुरीत राहणाऱ्या शक्ती भोसले याच्या फिर्यादीवरून मारहाण केल्या प्रकरणी तसेच खुतबुद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून खंडणी मागितल्या प्रकरणी रविकिरण इंगवले यांच्यावर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आठवड्यात दोन गुन्हे दाखल असूनही इंगवले अद्याप पसार आहेत. तरी देखील ऑडियो, व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून इंगवले आरोपांचे खंडन करत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ इंगवले यांना अटक करावी, अशी मागणी शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. यावेळी त्यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दलही आक्षेप नोंदवला आहे.

चव्हाण यांनी इंगवले यांना मोठा राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप करत पोलीस कारवाई का करत नाहीत ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे, तुकाराम साळुंखे, उदय भोसले, रमेश खाडे, रणजीत जाधव, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

Scroll to Top