सकाळपासून बीड जिल्ह्यातच थांबले
बीड – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी कालपासून मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यास सुरुवात केली होती . परंतु आज सकाळपासून त्यांची तब्येत खूपच बिघडल्याने ते बीड जिल्ह्यातील पाटोद्यात थांबले आहेत. जरांगेंची तब्येत अधिकच खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढचा प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.




