कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यात शिंदे गटाच्यावतीने संघटनात्मक बांधणी करताना नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. अंबप मधील विकासराव माने यांची उपजिल्हाप्रमुखपदी, तर पट्टणकोडोलीतील कृष्णाजी मसुरकर यांची हातकणंगले तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या हस्ते विकासराव माने आणि कृष्णाजी मसुरकर यांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते पुंडलिक जाधव, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार स्वामी, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष झाकीर भालदार, ऋषभनाथ पाटील, अक्षय मदने, रणजीत माने आदी उपस्थित होते.




