राजकीय

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील ‘या’ दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात मिळणार संधी..?

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – महायुती सरकारच्या सत्तावाटपाबाबत रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍यांची चर्चा झाली आहे. त्या अनुषंगाने आज  दुपारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे.   

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबरोबर झालेल्‍या भेटीत राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍यांची महत्त्‍वाच्‍या विषयांवर चर्चा झाली आहे. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण नकोच, अशी भूमिका मांडण्‍यात आली. यावेळी अर्थ खाते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच सोपवण्यात यावे, असा आग्रह धरण्यात आला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top