कोल्हापूर – गोकुळ दुध संघाच्या अंतिम मतदार यादीमधील अवसायनातील 492 संस्थासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने 492 दूध संस्थांना अपात्र ठरवण्याबाबतची आव्हान याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे या सर्व संस्था पात्र ठरल्या आहेत.
सहाय्यक निबंधक यांनी, अवसायनात काढलेल्या संस्था पैकी 194 दूध संस्था उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये पात्र ठरल्या होत्या तर अवसायनातील आणखी 298 दूध संस्था जिल्हा उपनिबंधक (दुग्ध) पुणे यांच्याकडे झालेल्या सुनावणीत पात्र ठरल्या होत्या. अशा एकूण 492 संस्थांच्या पात्रतेला इस्पुर्ली येथील श्रीराम दूध संस्थेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.




