कोल्हापूर – कोल्हापूर मधील विविध महत्त्वाच्या विकास कामात असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सने तांत्रिक सहभाग वाढवून जिल्हा आणि शहर योग्य पद्धतीने विकसित होण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन के.आय.टी कॉलेजचे माजी विभाग प्रमुख मोहन चव्हाण यांनी केले. इंजिनिअर्सच्यावतीने 59 व्या अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
कार्यक्रमाच्या सुरुवातील मोक्षगुंडम विश्वैसरया यांच्या प्रतिमेस मोहन चव्हाण यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी प्रस्तावना करताना असोसिएशनचे इंजिनिअर अध्यक्ष अजय कोराणे यांनी,पुढील तांत्रिक कार्यक्रमात शहरातील आणि जिल्ह्यातील वाहतुक समस्या सोडविण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपूल , रिंग रोड आणि शहरांतर्गत रोड याबाबत सादरीकरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सिनियर मेंबर श्रीनिवास दुधगावकर यांनी, असोसिएशन सभासद हितासाठी आणि समाजासाठी करत असलेल्या कामाची प्रशंसा करून भविष्यात सातत्य ठेवा अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे उपाध्यक्ष विजय चोपदार यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी असोसिएशनतर्फे असोसिएशनचे सभासद आर्किटेक्ट निशिकांत गोरूले व आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्टस् या राष्ट्रीय संस्थेच्या कोल्हापूर शाखेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनीय सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत, सूत्रसंचालन आणि आभार सेक्रेटरी राज डोंगळे यांनी केले.
यावेळी संचालक प्रमोद पवार, निशांत पाटील, प्रशांत काटे, सभासद सुनील मांजरेकर, प्रविण वाइचळ, राधेश्याम रेंगडे, श्रीपाद सरदेसाई, पराग माने, सुधीर हांजे, जीवन बोडके, संतोष पाटील उपस्थित होते.




