कोल्हापूर – बिद्री कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे बॉयलर अग्निप्रदीपन अध्यक्ष के. पी. पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मायादेवी पाटील यांच्या हस्ते तर डिस्टलरी विभागाचे बॉयलर अग्निप्रदीपन संचालक राहुल देसाई आणि रेश्मा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील यांनी, राज्यातील सहकारी साखर उद्योगासमोरच्या अडचणींवर मात करत शेतकरी, कामगार, अधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बिद्री साखर कारखान्याने राज्यातील अग्रगण्य साखर कारखाना म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे सांगितले. हीच परंपरा कायम ठेवत येत्या गळीत हंगामात दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला उपाध्यक्ष मनोज फराकटे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




