कोल्हापूर – आगामी गणेशोत्सव साऊंड सिस्टीम व्यतिरिक्त पारंपारिक वाद्याच्या गजरात साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यासाठी आज जुना राजवाडा पोलिसांनी साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईट मुक्त जनजागृती अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन केले होते. हातात डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर टाळा, अशा आशयाचे फलक हातात घेऊन विवेकानंद महाविदयालयाचे विदयार्थी तसेच पोलिस अधिकारी, कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते.
आगामी गणेशोत्सव पारंपारिक वाद्याच्या गजरात साजरा करा : पोलीस प्रशासनाचं आवाहन



