कोल्हापूर – काल दसरा चौकात खा. धनंजय महाडिक युवाशक्तीच्यावतीने दहीहंडी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना खा. महाडिक यांना आपल्या मुलाच्या पदाचा विसर पडल्याने चर्चांना उधाण आले आहे. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सध्या भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आहेत. यावर दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना खासदार महाडिक यांनी, मुख्यमंत्री फडणवीसांनी कृष्णराजला महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष केलंय. त्याच्यावर विश्वास ठेवून जबाबदारी दिलीय. त्याच्यावर किती प्रेम आहे बघा”
धनंजय महाडिक यांनी कृष्णराज यांचा उल्लेख थेट काँग्रेसचे युवक अध्यक्ष असा केला. यामुळे वडिलांनाच मुलाच्या पदाचा आणि पक्षाचा विसर पडला की काय, अशी आता विचारणा होवू लागली आहे. अजूनही रक्तात काँग्रेसच आहे कि काय अशी चर्चा आता सोशल मीडियावर होवू लागली आहे.




