कोल्हापूर : कोल्हापुरच्या राजकारणात गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीची चर्चा सुरू असताना दसरा चौकातील दहीहंडी उत्सवाचं पोस्टर चर्चेत आले आहे.
दसरा चौकात खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात येतो. यंदाच्या उत्सवाच्या पोस्टर वर महाडिक कुटुंबातील महत्वाच्या व्यक्तींचे आणि भाजप नेत्यांचे फोटो आहेत पण त्यांच्याच कुटुंबातील आमदार अमल महाडिक यांचा फोटो पोस्टर वर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पोस्टर वर आमदार महाडिक यांचा फोटो नसण्याला कौटुंबिक मतभेद कारणीभूत आहेत का याला गोकुळ मध्ये कुटुंबातील कुणी नेतृत्व करायचे याबद्दलची धुसफूस कारणीभूत आहे असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेयत.. एकूणच आमदार अमल महाडिक यांच्या शिवायच्या दहीहंडी उत्सवाच्या पोस्टरची सर्वसामान्य लोकांसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.




