कोल्हापूर – गडहिंग्लज तालुक्यातील कानडेवाडी येथील किरण महेश कदम हिची महाराष्ट्र शासनाच्या महाट्रान्स्को (महापारेषण) मध्ये सहाय्यक अभियंतापदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे तिने महाराष्ट्र राज्यात महिलांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल आमदार सतेज पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून तिचा सत्कार केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर, रामराजे कुपेकर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कानडेवाडीच्या कन्येने महाट्रान्स्कोमध्ये सहाय्यक अभियंतापदी मिळवलं यश…आ. सतेज पाटील यांच्याकडून सत्कार




