कोल्हापूर जिल्हा परिषदेतील गणेशोत्सव रद्द…

‘हिंदू एकता’ कडून आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर – जिल्हा परिषदेच्यावतीने प्रशासकीय इमारतीत गेल्या २२ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र एका संघटनेच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने यावर्षी गणेशोत्सव करणार नसल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि जनजीवनाचा अविभाज्य भाग म्हणून राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाची मान्यता दिली आहे. मात्र गणेशोत्सव रद्द केल्याबद्दल हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी, प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. दोन दिवसांमध्ये प्रशासनाने गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला नाही तर जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत महाआरती करून आंदोलन करण्याचा इशारा दीपक देसाई यांनी दिला आहे. केंद्र आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेतही महायुतीची सत्ता असताना गणेशोत्सव रद्द केल्याने हिंदुत्ववादी संघटनांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Scroll to Top