आता तुम्हाला तुमचा प्रभाग, मतदान केंद्र शोधण्याची गरज नाही... 

 

‘मतदार सेतू पोर्टल’ वरून मिळणार तुमचा प्रभाग 

<p>आता तुम्हाला तुमचा प्रभाग, मतदान केंद्र शोधण्याची गरज नाही... </p>

<p> </p>

कोल्हापूर -  प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करण्याची वेळ आली कि, आपलं मतदान केंद्र कुठे आहे ?, प्रभाग कुठे आहे ? हे शोधण्याची वेळ येते आणि आपला गोंधळ होतो. यासाठी या वर्षीच्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये ‘मतदार सेतू पोर्टल’ तुम्हाला उपयोगी पडणार आहे.
या पोर्टलमुळे मतदान केंद्र आणि प्रभाग शोधण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या पोर्टलवर आपण आपले नाव किंवा आडनाव किंवा संपूर्ण नाव किंवा निवडणूक ओळखपत्र क्रमांकाचा वापर करून आपल्या  मतदान केंद्राची माहिती तुम्ही मिळवू शकणार आहात.
या  पोर्टलवर जाण्यासाठी वरील QR Code स्कॅन करावे अथवा https://kmcvoter.kolhapurcorporation.gov.in:5050/
या लिंकवर क्लिक केल्यास आपले मतदान केंद्र तात्काळ मिळण्यास मदत होणार आहे.