वडणगेचा प्रज्वल दिंडे हरित सेतू प्रकल्पाच्या बोधचिन्ह डिझाईन स्पर्धेत पहिला
कोल्हापूर - हरित सेतू प्रकल्पाच्या बोधचिन्ह डिझाईन स्पर्धेत करवीर तालुक्यातील वडणगे येथील प्रज्वल जयसिंग दिंडे याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
पिंपरी चिंचवड मधील रामकृष्ण मोरे नाटयगृहात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचा तीन लाख रूपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. बोधचिन्हाचे अनावरणही यावेळी झाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. हे बोधचिन्ह हरित सेतू प्रकल्पाची ओळख असणार आहे.