८० मिनिटांचे नॉनस्टॉप स्केटिंग; १०१ खेळाडूंचा विक्रम

कोल्हापूर : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एस के रोलर स्केटिंग असोसिएशनच्या अडीच वर्षांच्या चिमुकल्यांपासून २० वर्षांपर्यंतच्या तब्बल १०१ खेळाडूंनी कोणताही ब्रेक न घेता सलग ८० मिनिटे स्केटिंग करत अनोखा विक्रम प्रस्थापित केला. फिटनेस, जिद्द, सातत्य आणि इच्छाशक्तीची ताकद दाखवून देणाऱ्या या उपक्रमाने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. वय कोणतेही असो, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर मोठे लक्ष्य साध्य करता येते, असा प्रेरणादायी संदेश या विक्रमातून देण्यात आला.तीन आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्समध्ये नोंद…..या ऐतिहासिक कामगिरीची नोंद फोर्ब्स वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक, यूएई वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि युरोपियन युनियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.या विक्रमात आयुष मोटे, रियांशी पाटील, मृण्मयी कांबळे, शंभुरादित्य कुंभार, आराध्य देसाई, दक्ष घोरपडे, दानियाल कच्छी, श्रीकृष्ण शिंदे, वेदांतिका शिंदे, अक्षीत पाटील, अनिरुद्ध देसाई, काव्या मजलेकर, स्पृहा कुरणे, तोशानी मगदूम, रणवीर पाटील, ऋषिकेश पाटील, हिरण्या अत्रिगे, अयांशु देवकर, राज आंबी, जिजा फरकाटे, शौर्य भालकर, स्वानंदी दड्डेकर, कियांश सारगर, शार्वी बावडेकर, अवनी पाटील, विवान पूनाटर, शिववंश देशमुख, आराध्य पारकर, शार्विल पाटील, आराध्या गावणी, कैरवी पाटील, अद्वैत कलानी, जिजा घोरपडे, इनाया शेख, अयेझा शेख, मायरा मुलाणी, श्रिषा शिंदे, अथांग पाटील, विराली चव्हाण, शौर्यवीर गिरगोंकर, उज्वल गुरव, लाडभी चपडा, राजवीर पाटील, तनिष्क खामकर, सुजल काजवे, हर्ष गुगले, पृथ्वीराज खट, दिव्या चोपडा, स्वप्नील कायली, संध्या कडेलकर, शायान मुल्ला, शिवाय शितोळे, प्रांशुल शितोळे, डॉ. महेश्वर शितोळे, अधिराज आठणे, तस्मिया सय्यद, लियांश पटेल, धृती कोंडेकर, आरोही चांदणे, शिवाई पवार, भूमिजा भालेकर, सईद जमादार, इवान शहा, सब्र नरसिंघानी, ग्रीषा पाटील, देवांश गोळे, समरजीत जितकर, नेत्रा अत्रिगे, अद्विका पाटील, शौर्य पाटील, ओवी पाटील, शिवराज रेपे, शिवांश बहिरशेठ, शिवम चव्हाण, हिरण्मयी कारेकर, सचिन खेडेकर, व्योम पॉपटानी, श्री सुतार, आर्य गोरे, अद्वैत काकडे, संस्कार शिंदे, ओंकार बामणे, उत्कर्ष कुंभार, सारंग कामथे, कार्तिक कदम, सुधांशू देवकर, विराज चिकमळ, सार्थक बारवकर, प्रथमेश बावधाने, आरुष कांबळे, वरद ओतारी, समद नांद्रेकर, वंश सातोणे, कान्हा लिघार, समर्थ बानसोडे, सुमंत पवार, प्रभास पवार, रुद्र इंदलकर, तेज पाटील, निनाद रांदिवे आणि उत्कर्षा बेलवलकर यांचा समावेश आहे.या उपक्रमाचे नियोजन प्रशिक्षक सुहास कारेकर यांनी केले. सर्व खेळाडूंना भूपाल शेटे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विक्रमवीरांचे अभिनंदन होत असून, अनेकांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Scroll to Top