इचलकरंजी – स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इचलकरंजीतील फायरिंग प्रकरणातल्या फरार आरोपीला आज उजळाईवाडी परिसरातून अटक केली आहे. सचिन उर्फ सॅम घोरपडे असे त्याचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.
महासत्ता चौकात सांगलीवाडी येथे राहणाऱ्या ओंकार कांबळे याच्यावर गोळीबार करून जखमी केल्याची घटना मार्च 20२६ मध्ये घडली होती. या प्रकरणी यापूर्वी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. दरम्यान या प्रकरणातील निष्पन्न गणेश आडेकर, सचिन उर्फ सॅम घोरपडे घटना घडल्यापासून फरार होते. यातील सचिन उर्फ सॅम घोरपडे हा आज उजळाईवाडी येथील पसरीचा नगर परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सचिन उर्फ सॅम घोरपडे याला अटक केली आहे.




