हवामान

डिसेंबरमध्ये थंडीचा प्रभाव राहणार कमी..?

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

हवामान विभागाकडून पुढील चार आठवड्यांचा अंदाज जाहीर..!

 पुणे – हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी गुरूवारी पुढील चार आठवड्यांचा किमान तापमानातील बदलाचा अंदाज प्रसिध्द केला आहे. त्यानुसार आज २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे पहाटे आणि रात्री थंडीचा प्रभाव जाणवू शकतो. मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून तापमानातील बदलाचे चित्र दिसत आहे, ११ ते १७ डिसेंबर आणि १८ ते २४ डिसेंबर या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात महाराष्ट्रातील बहुतांश भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचे संकेत आहेत. दरम्यान मध्य भारत, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागांत सुरुवातीच्या आठवड्यांत किमान तापमान कमी राहण्याची शक्यता आहे. तर पुढील आठवड्यांत देशातील अनेक भागांत तापमान वाढीचे संकेत आहेत.

संबंधित विषय

Scroll to Top