राजकीय

प्रत्येक देशप्रेमी लोकशाहीवादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला ठोकून काढले पाहिजे – खा . संजय राऊत

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – केंद्र सरकारने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक बोलवण्याची विनंती केली आहे. त्यानुसार लोकसभेचे कामकाज 30 नोव्हेंबरपासून आणि राज्यसभेचे कामकाज 2 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यावर बोलताना खा. संजय राऊत यांनी, “आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत. शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असल्याने संघर्ष आणि निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत, नाहीतर राष्ट्रद्रोही डिलिमिटेशन बिल अशा भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणण्याचे धाडस झाले नसते”, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला आहे.

खा. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे कि, ‘डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट आहे. जो कोणी याला पाठिंबा देईल, तो देशाच्या जनतेशी विश्वासघात करत आहे… ते २१व्या शतकातील सगळ्यात मोठे गद्दार म्हणून ओळखले जातील ! म्हणून प्रत्येक देशप्रेमी लोकशाहीवादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला ठोकून काढले पाहिजे. इतिहास गद्दारांची नावे सदैव लक्षात ठेवतो. गद्दारीबाबत केलेले खुलासे हवेत विरून जातात’

संबंधित विषय

Scroll to Top