प्रशासकीय

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून संविधान दुरुस्ती विधेयकातील बदलांना मंजुरी

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

नवी दिल्ली – डिलिमिटेशन विधेयकासाठी आगामी लोकसभेचे कामकाज 30 नोव्हेंबरपासून तर राज्यसभेचे कामकाज 2 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या डिलिमिटेशन विधेयकाला इतर पक्षांचा पाठिंबा मिळावा. यासाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणात जुळवा जुळव केली जात आहे. त्या अनुषंगाने आज केंद्रीय मंत्रिमंडळाने परिसीमन प्रक्रियेद्वारे महिलांना आरक्षण देण्यासाठी आणण्यात येणाऱ्या संविधान दुरुस्ती विधेयकातील बदलांना मंजुरी दिली आहे.
या प्रस्तावामुळे लोकसभेतील खासदारांची संख्या सध्याच्या ५४३ वरून वाढवून ८१५ करण्यात येणार आहे. लोकसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात येणार आहे. राज्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी १९७१ च्या जनगणनेचा आधार घेतला जाणार आहे. २०११ च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार आहे. ही व्यवस्था २०५१ पर्यंत लागू राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित विषय

Scroll to Top