नवी दिल्ली – निवृत्त सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तीन पानी पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमच्या अलीकडील शिफारशींमध्ये गुणवत्ता आणि सर्वसमावेशकतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये वंचित घटकांना डावलून एकाच समुदायाला प्राधान्य दिले आहे. तसेच न्यायाधीशांच्या बदल्यांमध्ये विसंगती करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
न्यायपालिकेत समान प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रपतींनी या प्रकरणात योग्य तो हस्तक्षेप करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. या पत्राच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनाही पाठवल्या आहेत.


