नवी दिल्ली – घटस्फोटानंतर मुलांचा ताबा (कस्टडी)आई कि वडिलांकडे द्यायचा या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. पालकत्व हक्काच्या (कस्टडी) वादात, पालकांच्या कायदेशीर अधिकारांपेक्षा मुलांचे कल्याण हे सर्वोच्च प्राधान्य असायला हवे. मुले ही केवळ मालमत्ता किंवा पालकांसाठी खेळणी नाहीत,” असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठाने दोन अल्पवयीन मुलांचा ताबा वडिलांकडे सोपविण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करून मुलांचा ताबा आईकडे सोपवला आहे.

