मुंबई – आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे. ज्यात लोकसभेच्या कालावधीत सर्व खासदारांनी सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे.
पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद डॉ. अमोल कोल्हे यांनी यासंदर्भातील पत्र जारी केले आहे. या पत्रात लोकसभेत अत्यंत महत्त्वाचे कामकाज होणार असल्याचे म्हटले असून पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आणि त्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत सर्व खासदारांनी उपस्थित रहावे, असे निर्देश दिले आहेत. मात्र, कोणत्या विशिष्ट विधेयकासाठी किंवा विषयावरील चर्चेसाठी हा व्हिप जारी करण्यात आला आहे, याचा उल्लेख पत्रात करण्यात आलेला नाही.




