आंदोलन

शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगविरोधात भुदरगड तालुक्यातील शेतकरी आक्रमक… गारगोटी प्रांत कार्यालयावर मोर्चा…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – भुदरगड तालुक्यात मोनार्क कंपनीमार्फत सुरू असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगच्या कामाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या मॅपिंगच्या कामाच्या निषेधार्थ आज भुदरगड तालुका शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्यावतीनं गारगोटी प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला.

या मोर्चामध्ये शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या भुदरगड तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी सुरू असलेल्या मॅपिंगच्या कामाचा निषेध नोंदवत प्रशासनाला जाब विचारला. शेतकऱ्यांचा विरोध असताना मॅपिंगचे काम कोणत्या आधारावर सुरू करण्यात आले, असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भूमिकेची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देत शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीशेती आणि उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय मॅपिंगचे काम सुरू करू नये, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

संबंधित विषय

Scroll to Top