इतर

क्रीडा विभागाच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याची लोककल्याण फाउंडेशनची मागणी

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – क्रीडा खेळाडूंसाठी सरकारी नोकरीमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. मागील अनेक दिवसांपासून क्रीडा कोट्यातून अनेकांनी बोगस खेळाडू सर्टिफिकेट देऊन नोकरी मिळवल्याच्या घटना उघडकीला आल्या आहेत. जिल्हा क्रीडा विभागाने गेल्या पाच वर्षात दिलेल्या क्रीडा प्रमाणपत्रांची चौकशी व्हावी, अशी मागणी लोककल्याण फाउंडेशनच्यावतीने करण्यात आली आहे.

 क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या कोल्हापूर विभागाचे उपसंचालक सुहास पाटील यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. खोट्या दाखल्यांवर नोकरी मिळवण्याच्या प्रकाराची चौकशी व्हावी, यासाठी तक्रार करणाऱ्या वैभव चव्हाण या व्यक्तीची आत्महत्या सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहे. बोगस सर्टिफिकेटद्वारे नोकरी मिळवलेल्यांनी चव्हाण यांचा घात केला असावा, असा लोककल्याण फौंडेशनने व्यक्त करत वैभव चव्हाण यांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. एक महिन्याच्या आत चौकशी करुन त्याचा अहवाल सादर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

या प्रसंगी क्रीडा अधिकारी राजश्री पाटील, वसंत पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळोखे, उपाध्यक्ष चंद्रकांत यादव, अनिल घाटगे, जगन्नाथ सूर्यवंशी, कपूर शेख, प्रकाश आमते, उदयसिंह यादव, अमर डेरे, रात्री खद्रे आदी उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top